Wednesday, 27 July 2011

Winners World

Winners World

ओळख वैदिक गणिताची :-

वैदिक गणित हा सोळा सूत्र आणि तेरा उपसूत्रांचा एक संच आहे. वैदिक गणिताचे शिल्पकार जगदगुरू शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थजी महाराज यांनी अथर्ववेदाचा आठ वर्षे गहन अभ्यास करून ही सूत्र निर्माण केलीत. अथर्व वेदातील श्लोकांच्या पुनर्रचनेतून वैदिक सूत्रांची निर्मिती झाली असे म्हटले तरी चालेल. स्वामीजींचा असा दृढ विश्वास होता की वेद हे सर्व ज्ञानाचे मूळ स्त्रोत आहे. जगाच्या पाठीवर असे कोणतेच ज्ञान नाही ज्याचा पाया वेदात नाही. म्हणूनच त्यांनी या सूत्रांना वैदिक गणित असे नाव दिले.
जगदगुरू शंकराचार्यांबद्दल जितके सांगावे तितके थोडे. असे व्यक्तिमत्व होणे कठीणच. स्वामीजींचा जन्म त्या काळी मद्रास इलाखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या थिन्नवेल्ली येथे मार्च 1884 ला अतिशय सुशिक्षित व सुसंस्कारीत कुटुंबात झाला. त्यांचे वडील तहसिलदार होते व डेप्युटी कलेक्टर म्हणून निवृत्त झाले. त्यांचे काका विजयनगर कॉलेजचे प्राचार्य होते.
आपल्या शैक्षणिक काळात स्वामीजींनी  कधीही प्रथम क्रमांक सोडला नाही. 1899 साली ते मद्रास विद्यापीठातून दहावी झाले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचे संस्कृतवर इतके प्रभुत्व होते की मद्रास संस्कृत संघटनेने त्यांना सरस्वती ही पदवी बहाल केली. 1904 साली वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी विशेष परवानगी घेवून एकाच वेळी 7 विषयांमध्ये त्यांनी एम ए केले आणि सातही विषयात ते अव्वल आले. हा त्यांचा एकमेवाद्वितीय जागतिक विक्रम आहे. या 7 विषयांत इंग्रजी, गणित, संस्कृत, विज्ञान, इतिहास असे निरनिराळ्या क्षेत्राशी संबंधीत विषय होते.
वैदिक गणिताच्या प्रत्येक सूत्रावर एक असे एकूण सोळा ग्रंथ स्वामीजींनी लिहिले होते. पण आपलेच दुर्दैव म्हणावे की ते सर्व ग्रंथ गहाळ झाले. आणि स्वामीजींनी त्यानंतर लिहिलेला सर्व सोळा सूत्रांची तोंडओळख करून देणारा एकमेव ग्रंथ आता आपल्याकडे उपलब्ध आहे. जर ते सर्व सोळा ग्रंथ आज उपलब्ध झाले असते तर गणित विश्वात मोठी क्रांती घडून आली असती. 

<< read more

Worldwide Recognised, Fastest Calculation Methods :-

As given by Swamiji in the preface to His book “Sixteen Simple Mathematical Formulae from Vedas” Vedic Sutras apply to and cover each and every part of each and every chapter of each and every branch of mathematics including arithmetic, algebra, geometry- plane and solid, trigonometry- plane and spherical, conics- geometrical and analytical, astronomy, calculus- differential and integral, etc. in fact there is no part of mathematics, pure or applied, which is beyond their jurisdiction.Vedic sutras are very easy to understand, easy to apply and easy to remember and the whole work can truthfully be summarized in one word “Mental”. Thus Swamiji has himself called these Vedic methods and Mental mathematics. << read more